सेक्स नको पण प्रेम आणि कुटुंब हवं,' एका असेक्शुअल महिलेची कहाणी
हसणारी-खिदळणारी आणि स्टायलिश पोशाख परिधान करणारी संध्या स्वतःचं वय 40 वर्षं असल्याचं सांगते, तेव्हा त्यावर पहिल्यांदा आपला विश्वासच बसत नाही. "तुम्ही तर जेमतेम 30 वर्षांच्या वाटता! 40 तर अजिबातच नाही. यामागचं गुपित काय आहे?" "गुपित म्हणजे- बॉयफ्रेंड नाही, नवरा नाही, कुटुंब नाही आणि टेन्शन नाही," संध्या हसत उत्तर देते. संध्या बन्सल एका ख्यातनाम कंपनीत मार्केटिंग अधिकारी आहे आणि दिल्ली-एनसीआर भागात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये ती एकटी राहते. असेक्शुअल म्हणजे अलैंगिक सल्यामुळे ती एकटी राहते. तिने लग्न केलेलं नाही आणि कुटुंबाबाबतचे तिचे विचार बरेच वेगळे आहेत. काही लोकांना दुसऱ्या व्यक्तीबाबत (पुरुष वा महिला) लैंगिक आकर्षण वाटत नाही. हा एक प्रकारचा लैंगिक कल (सेक्शुअल ओरिएन्टेशन) आहे. 'कुटुंबापेक्षा कधीही ओळख महत्त्वाची' कुटुंबाच्या पारंपरिक साच्यात आपली ओळख हरवून जावी, असं संध्याला वाटत नाही. सेक्स राफ्ट : 11 जणांना एका बोटीवर 101 दिवस कैद करून करण्यात आलेला विचित्र प्रयोग 'मी 'एकल' झाले कारण मला मासिक पाळी कधी आलीच नाही' ...